समाजात पती आणि पत्नीचे नाते पवित्र मानले आहे. या नात्यात जेवढे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा आहे,तेवढेच रुसवे,फुगवे,भांडणे आणि मतभेद देखील आहे. परंतु जिथे प्रेम आहे तिथे मतभेद होणारच .परंतु बऱ्याच वेळा असे बघण्यात आले आहे की पती पत्नींमध्ये पटत नाही, त्याचे कारण म्हणजे पतींना आपल्या पत्नीच्या काही सवय आवडत नाही त्यामुळे ते चिडतात आणि त्यांच्या मध्ये भांडणे आणि मतभेद होतात. आपल्या मध्ये देखील अशा काही सवयी असतील तर आजच या सवयींना बदलून टाका. जेणे करून आपल्या मध्ये भांडण होणार नाही.चला तर मग जाणून घेऊ या.
* संशय करणे- असं म्हणतात एकदा मनात संशयाचे बी रोपलें की त्याचे कोणी काहीच करू शकत नाही. बऱ्याच बायकांना आपल्या पतीवर संशय घेण्याची सवय असते. त्यांचा मोबाईल तपासणे, घरी उशिरा का आला अशा प्रश्नांनी त्या पतीला हैराण करतात या गोष्टीचा राग पतींना येतो आणि भांडणे होतात.