किचन टिप्स

बटाट्याचे परोठे बनवताना थोडीशी कसुरी मेथी घातल्याने परोठे जास्त चवदार बनतात. 

भाजीसाठी रसा तयार करायचा असेल तर कांदे आणि टोमॅटोला एक उकळी येईपर्यंत शिजवावे. त्यानंतर त्यातील पाणी काढून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टचा उपयोग ग्रेव्ही तयार करण्यासाठी करावा.

कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर त्यात एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरणार नाही.

लिंब बऱ्याच काळापर्यंत फ्रेश ठेवायचे असल्यास त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे.

पुदिन्याच्या पानांना वाळून हाताने त्याची पूड तयार करावी व ती पूड चाळणीने चाळून एका बरणीत भरून ठेवावी. या पुडेचा वापर फ्रूट चाट, बटाट्याची सुकी भाजी, चिप्स किंवा असे चटपटे पदार्थांवर घालून त्यांची चव वाढवू शकता.

वेबदुनिया वर वाचा