मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्यास हे उपाय अवलंबवा

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (21:22 IST)
मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असण्याचे बरेच कारणे असू शकतात. ही काही कायमस्वरूपी समस्या नाही. पुरेसा वेळ देऊन वातावरणाला बदलून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकतो. या साठी त्यांना कोणतीही शिकवणी देण्याची गरज नाही. कुटुंबाचा आणि पालकांचा मिळालेला साथच त्यासाठी पुरेसा आहे. आणि त्यांच्या मधील आत्मविश्वासाला वाढवतो.प्रत्येक पालकांना असं वाटतं की त्यांच्या पाल्याने सर्वात पुढे असावे. यशस्वी बनाव. या साठी त्यांच्या मध्ये आत्मविश्वास असणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या की मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवता येईल.
 
* जास्तीत जास्त वेळा द्या-
मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्यास त्यांच्या सह जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना समजून घ्या. त्यांची कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका. जास्त वेळ घालवण्याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण त्यांना सूचना करत राहा. ज्यावेळी ते मोकळे आणि एकटे बसले आहे त्यावेळी त्यांच्याशी गप्पा करा. त्यांना प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून द्या.
 
* सुरक्षेची हमी द्या-
आपल्या मुलाला कुठे आणि कशा परिस्थितीत सुरक्षित वाटतं ह्याची खात्री करा. आणि त्याला कुठे आणि कोणाबरोबर असुरक्षित वाटतं ह्याचा तपास करा. कारण ह्याच काही  गोष्टी मुलांमधील आत्मविश्वासाला कमी करत किंवा वाढवत.  
 
* कौतुक करा-
मुलांनी कुठलेही काम केले तर सुरुवातीलाच नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका. हे शक्य आहे की काम योग्यरीत्या झाले नाही परंतु त्यांनी प्रयत्न केला या साठी त्यांचे कौतुक करा. जर आपण सुरुवातीलाच नकारात्मक प्रतिक्रिया दिली तर आपण स्वतः आपल्या मुलाचे आत्मविश्वास कमी कराल.
 
*  जबाबदारी सोपवा-
मुलांच्या आत्मविश्वासाला वाढविण्याचा सर्वात चांगला आणि उत्तम मार्ग आहे की आपण त्यांच्या वर कमीतकमी जबाबदाऱ्या सोपवा. जेव्हा ते छोट्या-छोट्या गोष्टी करतात तर त्यांच्या मध्ये आत्मविश्वास वाढेल. आपण त्यांच्या केलेल्या कामाचे गोड कौतुक करा. त्यांना प्रोत्साहन द्या. जर ते अडचणीं मध्ये येतात तर त्यांना पुरेसा वेळ द्या आणि समजवा की कशा प्रकारे या समस्येचा तोडगा काढता येईल. लगेचच मदतीसाठी धावत जाऊ नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती