टॉवेलची काळजी कशी घ्याल ...

शुक्रवार, 12 जून 2020 (08:39 IST)
* मस्तपैकी अंघोळ केल्यानंतर घाण वास मारणारा टॉवेल हाती आला की डोकं फिरून जातं. असे टॉवेल गरम पाण्यात धुवावे आणि त्या पाण्यात अर्धा- एक कप व्हिनेगरही टाकावं.
 
* जर टॉवेल ब्राइट आणि कलरफुल ठेवायचा असेल तर तो पहिल्यांदा धुताना व्हिनेगर वापरा. त्यानंतर दिलेल्या सूचनांप्रमाणे वाळवा.
 
* नेहमी टॉवेल वापरल्यानंतर लगेच उन्हात वाळवावा.
 
* जर नव्या टॉवेलमधून फायबर निघत असेल तर तो टॉवेल लागोपाट दो-तीन वेळा धुवा.
 
* टॉवेल धुताना खूप डिटर्जंट वापरू नये. याने टॉवेल कडक होतो.
 
* सॉफ्ट आणि फ्लफी ठेवण्यासाठी टॉवेलला ड्रायरमध्ये इतर कपड्याबरोबर वाळवू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती