'वर्कींग वूमन'ला दिवसाचा सगळ्यात मोठा भाग ऑफिसच्या कामात घालवावा लागत असतो. कामाचा प्रचंड व्याप, टार्गेटचं डोक्यावर असलेलं ओझं, ऑफिसमधील पॉलिटिक्स, सहकाऱ्यांचे हेवे दावे अशा एक ना अनेक समस्यांच्या कचाट्यात ती अडकलेली दिसते. घर आणि कार्यालय यांच्यात उत्तम बॅलेन्स करण्यासाठी महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ती महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. ऑफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-
आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकार्यांची गोष्ट दुसर्या सहकार्याला सांगू नका.
ऑफिसात कुणाशी वाद होणार नाही याची काळजी घेऊन सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा ऑफिस कामावर व ऑफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.