Bedtime Beauty Hacks झोपण्यापूर्वी फॉलो करा या 5 ब्युटी टिप्स, सौंदर्य वाढेल

सोमवार, 26 जून 2023 (13:02 IST)
Bedtime Beauty Hacks थकव्यामुळे झोपण्यापूर्वी अनेक लोक आपल्या त्वचेसाठी काही विशेष करू पात नाहीत, परंतु ही सवय थोडी बदलली तर खूप फायदा होऊ शकतो. दिवसभराच्या धावपळीमुळे त्वचेच्या दिनचर्येकडे लक्ष देता येत नाही, पण रात्री झोपताना काही काम केले तर बरेच काही होऊ शकते.
 
काही स्त्रिया दिवसभर आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतात, परंतु रात्री शारीरिक थकव्यामुळे त्या त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जातात, परंतु तुम्हाला माहित आहे का की आपण रात्री झोपत असताना देखील आपल्या शरीराचे अवयव आपले काम सुरळीतपणे करत असतात. जेणेकरून तुम्ही सकाळी उठून स्वतःमध्ये ताजेतवाने व्हाल. जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमी चमकत असावी आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल, तर झोपण्यापूर्वी तुम्हाला या 5 गोष्टी कराव्या लागतील.
 
पाण्याने चेहरा धुवा
त्वचेच्या काळजीसाठी रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी अंमलात आणणे आवश्यक आहे आणि सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने चेहरा धुणे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही नेहमी रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा थंड आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून झोपायला जा. जर तुम्हाला झोपायची घाई असेल तरी निदान स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
 
हर्बल फेस मास्क वापरा
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावलेला हर्बल फेस मास्क हा त्वचेला निरोगी आणि पोषक ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. याचा वापर केल्याने, त्वचेतील पोषक तत्व गमावण्याव्यतिरिक्त, ओलावा पुन्हा भरला जातो. जे तुमच्या त्वचेसाठी प्रत्येक प्रकारे योग्य आहे. उन्हाळ्यात तुम्ही मुलतानी माती, काकडी किंवा चंदन पावडर लावू शकता. असे करणे जमतं नसेल तर निदान एलोवेरा जेल लावून झोपू शकता.
 
डोळ्यांची विशेष काळजी घ्या
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम लावणे तसेच आय ड्रॉप्स टाकायला विसरू नका. डोळ्यांच्या पृष्ठभागाचा भाग अतिशय संवेदनशील आहे, म्हणून त्याला अतिरिक्त काळजी आवश्यक आहे. डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवरील काळे डाग घालवण्यासोबतच सुरकुत्या घालवण्यासाठी आय क्रिमचा वापर करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली क्रीम लावायला विसरू नका आणि थेंब टाकायलाही विसरू नका. यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल.
 
त्वचा मॉइश्चरायझ करा
कोरड्या त्वचेवर ओलावा परत आणण्यासाठी तुम्ही क्रीम, लोशन किंवा खोबरेल तेल वापरून केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझ करु शकता. अशात झोपल्यानंतर तुमच्या त्वचेत आर्द्रता टिकून राहते आणि अकाली पडणाऱ्या सुरकुत्याही दूर होतात.
 
केसांची मालिश
त्वचेसोबतच तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांनाही मसाज करू शकता. असे केल्याने तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि तुम्ही गाढ झोपू शकाल. गाढ झोपेमुळे तुमची त्वचा चमकू लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती