* वाईट लोकांपासून लांब राहावं.
आपल्या सभोवताली असे काही लोक असतात ज्यांचे विचार वाईट असतात किंवा ते स्वतः वाईट असतात. अशा लोकां पासून लांब राहावं. जेणे करून आपल्याला आनंदी राहता येईल. वेळेच्या महत्त्वाला समजा. वेळ वाया घालवू नका.
* असं काम करा जे केल्यानं आनंद मिळेल-
प्रयत्न करा की मन शांत ठेवा, कारण मन शांत असेल तर चांगले विचार येतील. जे आपल्याला आनंदी ठेवतील. ऑफिसातून काही दिवस विश्रांती घ्या आणि स्वतःला वेळ द्या.या मुळे आपल्याला आनंद मिळेल.रागावर नियंत्रण ठेवा.
* झाडे लावा- आपण जे काम करत आहात त्यावर विश्वास ठेवा, जर आपण स्वतःवर विश्वास ठेवाल तर लोक आपल्या केलेल्या कामाचे कौतुक करतील .घराच्या गच्चीवर झाडे लावू शकता. या मुळे आपल्या सभोवतालीचे वातावरण सुंदर आणि स्वच्छ राहील आणि मन आनंदी राहील.
* सकारात्मक विचारांकडे लक्ष द्या-
आपल्या जीवनातील चांगले क्षण छायाचित्राच्या रूपात जपून ठेवा. हे चित्र आपण आपल्या ऑफिसच्या टेबला वर किंवा घराच्या खोलीत लावू शकता. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. असं केल्यानं आपण आनंदी राहाल.