'ह्या' सोप्या उपायाने करा दूर पावसाळ्यात घरातील दुर्गंध

शनिवार, 22 जुलै 2023 (16:08 IST)
bad smell in rainy daysपावसाळ्यात हवेमध्ये दमटपणा असल्याने घर असो की परिसर लवकर कोरडा होत नाही. घरामध्ये ओलावा निर्माण झाल्याने दुर्गंध पसरतो. त्यामुळे घराच्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. तुम्ही घरातील स्वच्छतेची काळजी सोबत आम्ही सांगितलेल्या टिप्सचा वापर केल्यास दुर्गंधीपासून मुक्ती मिळवाल.
 
फ्रीजमधील दुर्गंधी
फ्रीजमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य असल्याने दुर्गंधी येत असते. फ्रीजमध्ये लिंबू किंवा पुदीना ठेवल्याने दुर्गंधी येत नाही.
 
कपाटातील दुर्गंधी
कपडे ठेवलेल्या कपाटात दुर्गंधी येत असल्यास चुना ठेवा. 
 
अंड्याचा वास
भांड्याध्ये येणार्‍या अंड्याच्या वासापासून सुटका हवी असल्यास भांडे व्हिनेगरने धुवा.
 
दुधाचा वास
दूध ऊतू गेल्याने भांड्याचा वास येतो. इलायचीची पूड टाकल्याने कमी होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती