नव्या दिवसाची सुरुवात हवी असेल चांगली तर अमलात आणा या 10 गोष्टी

दुसर्‍या दिवशी कोणते कपडे घालून बाहेर पडायचे आहे ते रात्रीच विचार करून ठेवा. त्या कपड्यांना इस्त्री नसेल तर आधी प्रेस करा. त्याचबरोबर एसेसरीज आणि फुटविअरही तयार ठेवा.

आपली हँडबॅग किंवा ऑफिस बॅग रात्रीच जमवून ठेवा. त्यात आवश्यक वस्तू जसे किल्ल्या, चार्जर, पेन, वॉलेट असल्याचे चेक करून घ्या.

डिनर केल्यानंतर वॉक घ्या. झोपण्यापूर्वी ब्रश करा आणि शॉवर घ्या. आणि रात्री आरामदायक कपडे घालून झोपा.
डब्यात काही सुके स्नेक्स किंवा ड्राय फ्रूट्स घेऊन जात असाल तर रात्री डबा भरून ठेवा.

दुसर्‍या दिवशीची प्लानिंगही आदल्या दिवशी करून घ्या. कोणते काम कोणत्या क्रमाने पार पडायचे आहे ते एका डायरीत नोट करून घ्या किंवा मनात तरी ठरवून घ्या.
दिवसभर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकाराचे अनुभव येत असतात म्हणून रात्री झोपण्यापूर्वी न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टी आठवा.

आपलं चित्त शांत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी झोपण्यापूर्वी आपली आवडती पुस्तक वाचू शकता.
झोपण्यापूर्वी प्रार्थना करणे किंवा मेडिटेशन करणेही सर्वात उत्तम ठरेल. याने डोक्यात येत असलेले असंख्य विचारांवर ब्रेक लागेल आणि मन शांत होईल.

रात्री झोपताना मोबाइल, टीव्ही, कम्प्यूटर यापासून स्वत:ला दूर ठेवा. सतत मेसेज किंवा ईमेल चेक करत राहिल्याने मेंदूला शांतता मिळत नाही आणि झोप अपूर्ण राहते.
7 ते 8 तासाची झोप आपल्याला दुसर्‍या दिवशी ताजेतवाने ठेवण्यात मदत करते. म्हणून आपली रात्री एवढ्या तासाची झोप तरी झालीच पाहिजे याची काळजी घ्या.

वेबदुनिया वर वाचा