नको भाजी-पोळी, हवा आवडीचा डबा

डब्यात रोजची भाजी-पोळी, फोडणीचा भात, पोहे किंवा उपमा पाहिला की मुलांना लागलेली भूक मंदावते, आणि ते कसतरी अर्धवट डबा संपवतात. रोज डबा पूर्ण का नाही खाल्लास? हा स्वर घरोघरी ऐकू येतो. म्हणूनच अता टिफिनमध्ये काय देयचं हा प्रश्न असल्यास पाहू या काही मजेदार फूड आयटम, जे बनवण्यात सोपे असून मुलांना नक्कीच आवडतील.



पोळी पिझ्झा
पोळी किंवा पराठ्याला टोमॅटो केचप लावून त्यावर भाजी पसरा. यात वेगवेगळ्या भाज्या पसरविता येतील. बटाटे, टोमॅटो, सिमला मिरची, पनीर व इतर. त्यावर थोडंसं चीज पसरा. कुकी कटरने तिला आकार द्या. हवं असल्यास तिला बेक करा.
पोळी रोल
पोळी भाजी म्हटल्यावर मुलांना खायला कंटाळा येतो. म्हणून पोळी भाजीला रोल म्हणून सर्व्ह केला तर ते आवडीने खातील. पोळीवर सुकी भाजी टाकून ती वळवून घ्या. यात पुदिन्याची चटणी किंवा जॅमही लावता येईल. त्यावर थोडं चीज किसून घाला.

 
फ्राइड पोळी
पोळीचे चार तुकडे करून तिला तळून घ्या. त्यावर मीठ, जिरावण किंवा चाट मसाला टाकून मुलांना खायला द्या. ही क्रिस्पी पोळी त्यांना नक्कीच आवडेल.

वेबदुनिया वर वाचा