तुमच्यात थोडं प्लॅनिंग आणि क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला 'देसी घर आणि परदेसी लूक' साकारता येईल. डेकोरेशनची खासीयत
खिडक्यांची ट्रीटमेंट अगदी साधी आणि सोपी ठेवायला पाहिजे. तसं केल्यानेच घराला प्रायव्हसी आणि उबदारपणा राहील.
कोलोनिअल स्टाइलचं फर्निचर खूप साधं आण रस्टिक लूकमध्ये असतं. अमेरिकेहून स्थलांतरित झालेल्या ब्रिटिशांनी आणलेल्या फर्निचरला सध्या अण्टिक या सदरात धरलं जातं. त्यामुळे ते फर्निचर या थीमसाठी योग्य ठरेल. तुमची रूम अधिक खुलून दिसण्यासाठी फॅब्रिकचा वापर करायला हवा.