आम्ही बोर होतोय...

शुक्रवार, 3 जुलै 2015 (12:52 IST)
आजकाल पालकांसाठी सर्वात मोठी अडचण आहे आपल्या मुलांना व्यस्त ठेवण्याची. आजकाल परिवार संयुक्त नसून लहान झाले आणि घराची जागा फ्लॅट्सने घेतल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी योग्य जागाच सापडत नाही. थोडी बहुत जागा सापडली तरी आपल्या वयाचे मित्रही भेटतील यात शंकाच असते. म्हणूनच मुलांना व्यस्त ठेवणे आई-वडिलांसाठी एक मोठी समस्या आहे. मुख्यतः: त्यांच्यासाठी ज्यांचे मुलं तीन ते सहा वर्षाचे आहे. सुट्टीच्या दिवशी मुलं आम्ही बोर होतोय म्हणून ओरडत असतात. थोडासा वेळ आणि चांगली योजना असेल तर अश्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. थोडाश्या प्रयत्नाने त्यांना घरातच व्यस्त ठेवा:
 
आत्मनिर्भर बनवा
सर्वात आधी त्यांचा झोपण्या, उठण्या, खेळण्या, जेवण्या आणि टीव्ही बघण्याची वेळ निर्धारित करावी. सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना अंघोळ करणे, कपडे घालणे, चुटपूट नाश्ता तयार करणे, त्यांची अलमारी जमवणे व इतर काम करू द्यावी. याने त्यांना चांगल्या सवयी लागतील आणि ते बिझी राहतील. आपण करत असलेल्या रेगुल्यर कामांमध्ये त्यांना मदत करू द्या. याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि ते बोर होणार नाही.



 
अदलून-बदलून द्या खेळणी
भरपूर खेळणी असली तरी मुलं रोज रोज तीच खेळणी खेळून बोर होतात आणि नवीन खेळण्यांची मागणी करतात. म्हणून त्यांना सर्व खेळणी एकत्र देण्याऐवजी अंतर ठेवून द्या. काही खेळणी बाजूला ठेवून द्या आणि जेव्हा ते आधीच्या खेळणींनी बोर होतील तेव्हा दुसरा सेट काढून द्या. याने त्यांची रुची निरंतर खेळण्यांमध्ये बनली राहील.

सामान्य ज्ञान
रोज एका जागी बसून त्यांना सर्व धर्मांचे थोडे-थोडे ज्ञान द्या आणि त्यानुरूप त्यांना आचरण करायला सांगा. वेळ मिळ्याल्यावर त्यांना ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा आणि तेथील महत्त्व सांगा. त्यांना पर्यावरणाबद्दल माहिती द्या आणि आपल्या आविष्यासाठी पर्यावरण जपणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून द्या.
 
फिरायला घेऊन जा
सुट्टीच्या दिवशी त्यांना जू, गार्डन किंवा एखाद्या प्राकृतिक स्थळावर फिरायला घेऊन जा. याने त्यांना शुद्ध वातावरणात मोकळं खेळायलाही मिळेल. मुलांबरोबर शॉपिंगचा प्लान चुकीचा ठरेल. गर्दीत मुलांना अजिबात आवडतं नाही आणि ते आणखी वैतागतात.
 
गोष्टी सांगा
टीव्हीकडे थोडंसं दुर्लक्ष करून रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एखादी शिक्षाप्रद गोष्ट जरूर सांगा. अशाने मुलांबरोबर नव्याने संवाद निर्माण होतो. त्यांच्या मनात काय चालू असतं ते कळून येतं. चांगल्या गोष्टींनी आपण त्यांचे चांगले व्यक्तिमत्त्व घडवू शकता.

वेबदुनिया वर वाचा