शक्ति उपासनेचे पीठ पावागढ

पंखिंडा तू उडी ने जजे पावागढ रे... नवरात्रोत्सवादरम्यान या गुजराती गरब्याच्या ठेक्यावर बहुतेकांची पावले थिरकली असणार. शक्ति उपासकांना आम्ही यावेळी गुजरात येथील पावागढ मंदिराची भेट घडवणार आहोत. येथील काली मातेचे प्रसिद्ध मंदिर मातेच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. सती मातेचा देह पडलेल्या ठिकाणास शक्तिपीठ म्हणून मान्यता आहे.

पुराणातील दाखल्यांनुसार वडिल दक्षांच्या यज्ञात अपमानित झालेल्या सती ने योगबळाच्या सामर्थ्यावर प्राण त्यागले होते. सतीच्या मृत्युने दुखावलेल्या भगवान शिवशंकराने तिचा मृतदेह घेऊन तांडव करत संपूर्ण ब्रम्हांड पालथे घातले होते.

यावेळी मातेचा देह जेथे जेथे पडला,
WD WD  
त्याठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. पावागढ येथे मातेचे वक्षस्थळ पडले होते, अशी मान्यता आहे.
विश्वमातेचे स्तन पडल्याने या ठिकाणास पावित्र्य प्राप्त झाले आहे. याठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मातेची दक्षिणमुखी मूर्ति आहे. येथील पहाडास गुरू विश्वमि‍त्रांचेही वास्तव्य लाभले आहे.

विश्वामित्रांनी येथे काली मातेची तपस्या केली होती, अशी मान्यता आहे. काली मातेच्या मूर्तिची प्रतिष्ठापणा विश्वामित्रांनीच केली होती, असेही मानण्यात येते.

WD WD  
पहाडास लागून वाहणारी नदीही 'विश्वामित्री' नावानेच परिचित आहे. पावागढच्या नावाविषयीही एक आख्यायिका आहे. दुर्गम असणारा हा पर्वत चढणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. चारही बाजूंनी खोल दर्‍या असल्याने येथे चौबाजूंनी वेगात वारे वाहायचे. यामुळेच या ठिकाणास पावागढ म्हणजेच चारही बाजूंनी वार्‍याचे अस्तित्व असलेले ठिकाण.

बडोद्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरील चंपारण्य या गुजरातच्या प्राचीन राजधानी पासून जवळच हे मंदिर आहे. पावागढ मंदिर उंच पर्वताच्या टोकावर वसले आहे. खूप उंचावर असलेल्या या मंदिरावर चढून जाणे खूप कठिण आहे.

सरकारने येथे आता रोप पे ची व्यवस्थ
WD WD  
केली आहे. या रोप वे मुळे भाविकांना माछी येथून पावागढच्या पर्वतावर पोहचणे सहज झाले आहे. रोप वे मधून उतरल्यावर साधारणत: अडीचशे पायर्‍या चढल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहचतो. नवरात्रादरम्यान मंदिरात भाविकांची गर्दी जमते. येथे दर्शन घेतल्यास माता इच्छापूर्ति करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


कसे पोहचायचे -
विमानाने जायचे झाल्यास अहमदाबाद व बडोदा ही विमानतळ अनुक्रमे एकशे नव्वद व पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. बडोदा जवळचे रेल्वे स्टेशन असून दिल्ली व अहमदाबादहून रेल्वेने जोडले आहे. बडोद्याहून बसने जाण्याची सुविधाही उपलब्ध आहे. गुजरात मधील प्रमुख शहरांतून येथे पोहचण्यासाठी खाजगी व सरकारी बसेस, टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा