शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप

'वाराणसीतु भुवनत्रया सारभूत
रम्या नृनाम सुगतिदाखिल सेव्यामना
अत्रगाता विविधा दुष्कृतकारिणोपि
पापाक्ष्ये वृजासहा सुमनाप्रकाशशः'

नारद पुरा
WD
गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.

धार्मिक महत्त्व
WD
वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे. पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते. तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले. काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते. ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते.

काशी विश्वनाथ मंदि
WD
गंगेच्या किनार्‍यावर अरुंद विश्वनाथ गल्लीत विश्वनाथाचे मंदिर आहे. त्याच्या चहूबाजूने मंदिरे आहेत. येथे एक विहीरही आहे. तिला 'ज्ञानव्यापी'ची संज्ञा दिली जाते. ती मंदिराच्या उत्तरेला आहे.

विश्वनाथ मंदिराच्या आत एक मंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे साठ सेंटिमीटर उंच शिवलिंग आहे. हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मित आहे. मंदिराचा आतील परिसर मोठा नसला तरीही तेथील वातावरण शिवमय आहे.

ऐतिहासिक महत्त्व
WD
हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते. इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती. लाहोरचे महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते. 1983 मध्ये उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतले आणि काशीचे माजी नरेश विभूती सिंह यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली.

पूजा-अर्चना
हे मंदिर रोज भल्या पहाटे 2.30 वाजता मंगल आरतीसाठी खुले केले जाते. ही आरती सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालते. भाविक तिकिट घेऊन या आरतीत भाग घेतात. त्यानंतर 4 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी मंदिर खुले होते. 11.30 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत नैवैद्य आरतीचे आयोजन होते. 12 वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत परत या मंदिरात सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था आहे. संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत सप्तऋषी आरती चालते त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व भाविक मंदिराच्या आत दर्शन करू शकतात. 9 वाजेनंतर मंदिर परिसराबाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. शेवटी 10.30 वाजता रात्री शयन आरती प्रारंभ होते. लोकानी वाहिलेला प्रसाद, दूध, कपडे आणि अन्य वस्तू गरीबांमध्ये वाटल्या जातात.

कसे पोहचाल?
हवाई मार्गे : वाराणसी शहर देशाच्या जवळपास सर्व मुख्य शहरांशी हवाई मार्गे जोडलेले आहे. तरीदेखील दिल्ली-आग्रा-खजुराहो-वाराणसी मार्ग पर्यटकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

रेल्वेमार्गे : वाराणसी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि भारताच्या बर्‍याच महत्त्वपूर्ण भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडले आहे. दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणांसाठी वाराणसीहून राजधानी एक्सप्रेसही जाते. वाराणसीपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर स्थित मुगलसरायपासूनही बर्‍याच स्थानांसाठी रेल्वे व्यवस्था आहे.

रस्तामार्गे : गंगेच्या मैदानात असल्यामुळे वाराणसीसाठी रस्त्यामार्गे जाण्याची उत्तम व्यवस्था आहे. उत्तर प्रदेशाच्या विविध भागांतून येथे सरकारी आणि खाजगी बसची उत्तम व्यवस्था आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा