बदामाची बर्फी

साहित्य- दोन वाट्या बदाम, दीड वाटी दूध, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, एक लहान चमचा इलायची पावडर

प्रक्रिया-
NDND
बदाम रात्रीच भिजवण्यासाठी ठेवा. सकाळी पाण्यातून बाहेर काढून दुधाबरोबर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. आता ह्या मिश्रणात साखर टाकून ते चांगल्या पद्धतीने मिसळून घ्या. तुम्ही जेवढे चांगल्या पद्धतीने साखर व मिश्रण एकत्र कराल तेवढी चांगली मिठाई बनेल.

आता गॅस चालू करून या मिश्रणात सलग हलवत रहा. मिश्रण कडक होऊ लागल्यावर त्यात तूप घाला. आता याला तूप लावलेल्या ताटात पसरून द्या व वरून इलायची पावडर टाका. गार झाल्यानंतर हव्या त्या आकारात कापून घ्या.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा