राहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार

शुक्रवार, 23 जून 2017 (07:42 IST)

देशातील प्रतिष्‍ठेच्‍या साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍काराची घोषणा गुरुवारी करण्‍यात आली. मराठीतील दोन साहित्‍यिकांना यंदाचे पुरस्‍कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार कोल्‍हापूरच्‍या राहुल कोसंबी यांच्या 'उभं-आडवं' या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्‍या खारीचा वाटा या पुस्‍तकाला बालसाहित्‍य पुरस्‍कार जाहीर झाला.  अकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत  गुवाहाटी येथे केली.  ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा