शिकविणे ही काही लुप्त झालेली कला नाहीये. पण लुप्तप्राय झालेली परंपरा मात्र नक्कीच आहे. - जॅकस बारजन
चांगले शिक्षक अमुल्य असतात. पण वाईट शिक्षकांची किंमत जास्त असते. - बॉब टेलबर्ट
ज्ञान आपली खूण निर्माण करते. त्याचा प्रसार एकाकडून दुसऱ्याकडे होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी हा एखाद्या भांडाराप्रमाणे असतो. त्यात आपण आपले अमुल्य विचार साठवू शकतो. - युजेन पी बर्टीन
सामान्य शिक्षक फक्त सांगतात. चांगले शिक्षक स्पष्टीकरण देतात. आणि उत्कृष्ट शिक्षक प्रभावशाली संवाद साधतात. - विल्यम अर्थर वॉर्ड
शिक्षक म्हणजे तरी काय? ते देत असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त महत्त्व आहे काय? - कार्ल मेनिंजर
सोने आणि हिऱ्यासारखी चमक, त्याचे महत्त्व त्याच्या दुर्मिळतेत आहे. - सॅम्युअल जॉन्सन
माझ्या मते मानवाची मुक्ती त्याच्या ज्ञानात आहे. - जॉर्ज बर्नाड शॉ
शिकवताना त्यापेक्षा दुप्पट ज्ञान मिळवा. - जोसेफ जोऊबर्ट