ज्येष्ठ कवी वामन निंबाळकर यांचे निधन

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि कवी प्रा. वामन निंबाळकर यांचे शुक्रवारी दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. मूळचे बुलडाण्याचे असलेले प्रा. निंबाळकर यांचे शिक्षण औरंगाबादेत झाले. नंतर तेथेच त्यांची नाळ आंबेडकरी चळवळीशी जुळली.

प्रा. निंबाळकर हे दलित कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्येक्त आंबेडकरी विचावंत म्हणूनही त्यांची चळवळीत ओळख आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते. शिक्षणानंतर ते नागपुरात आले आणि नंतर पुन्हा चळवळीत आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला. त्यांच्या 'गावकुसाबाहेरच्या कविता', 'महायुद्ध', 'आई' व 'वाहत्या जखमांचा प्रदेश' आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या या कविता चार विद्यापीठांतील अभ्यासक्रमात आहेत.

वेबदुनिया वर वाचा