लहानपणी असें वाटे, कधी कधी मोठे होते!
सायकल ने शाळेत जाईन, खुप मनात होतें,
नंतर त्याचा येऊ लागला कंटाळा,वाटलं कॉलेज बरा!
वर्ग मोठे होत गेले, अभ्यासाचा कित्ती वाढला पसारा!
मन फुलपाखरू होऊ लागले होतें, मन कुठं कुठं भटकंती करू लागले होते,
एका ठिकाणी राहील तर ते मन कस?
बाहेरून टोमणे येतं, चूप वाटेल का बसावस!
आत्मनिर्भर होईल, असा विश्वास खुप,
नवीन जगाचे बघितले रोज बदलते रूप,
खूप खाल्ल्या खस्ता, झाले पायावर उभी,
मोठेपणा आला तसा कित्ती सुटल्यात बाबीं !
सुरू झाली घोडदौड, करीयर साठी येथे,
फुरसत नव्हती थांबायला क्षणभर इथे!
स्पर्धा होत्या खूप होती बरीच आव्हाने,
कमान आयुष्याची उंचावत होती सातत्याने,
बघितलं मागे वळून, लहानपण दूर होतं बसून,
बोलावत होत मला ते रोज खुणावून,
वाटलं नको नको ते मोठं होणं, लहानच बरं!
आयुष्याची खरी मज्जा याच काळात हेच खरं!!
.......अश्विनी थत्ते.