×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पु.ल. देशपांडे यांच्या कविता
गुरूवार, 12 जून 2025 (13:33 IST)
मी एकदा आळीत गेलो
मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो,
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ
कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ,
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण
गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम,
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे
खुदकन् हसू चे पैसे आठ
खो खो खो चे एकशे साठ,
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा — कुणी वंदा
कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा
ःःःःःःःःःःःःःःःः
च्यालेंज
अहो ज्ञानियांच्या राजा।
कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचीली ओवी।
व्हाल का हो नवकवी?
मारे बोलवीला रेडा।
रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी।
लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात।
तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी
एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा।
आमुचा च्यालेंज स्विकार
ःःःःःःःःःःःःःःःः
फोटोतली तरुणी
माझ्या खोलीतल्या
फोटोतली तरूणी परवा
मला म्हणाली
मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना-इथे
माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय
ःःःःःःःःःःःःःःःः
प्रश्न
आताशा बुडणा-या सुर्याला
बराय उद्या भेटू
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
सुर्य आता म्हातारा झालाय.
ःःःःःःःःःःःःःःःः
मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.
कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!
ःःःःःःःःःःःःःःःः
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
पु.ल. देशपांडे पुण्यतिथी विशेष : पु.ल. देशपांडे यांची माहिती
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील ५ दिवसांसाठी IMD अलर्ट
चुलत बहिणीसोबत संबंध ठेवण्याच्या इच्छेने तरुणाने तिच्या प्रियकराची हत्या केली, मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला
पुण्यातील एका झाडातून पाणी पडण्याला लोक चमत्कार समजून पूजा करू लागले, आता सत्य समोर आले
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये 'मैत्रीपूर्ण लढाई' होईल
नक्की वाचा
अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल
देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम
Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा
नवीन
नवऱ्याशी नातं मजबूत ठेवण्यासाठी 5 सोपे मंत्र
Babasaheb and Mata Ramabai's wedding anniversary रमाबाईंचा बाबासाहेबांच्या जीवनावर होता प्रभाव
पाहुणे मंडळींसाठी झटपट नाश्ता; बनवा चविष्ट पालक भजी
रक्त घट्ट होण्याची प्रमुख लक्षणे, आजार, कारणे आणि उपचार
Career in Bsc in neurophysiology technology :बीएससी इन न्यूरोफिजियोलॉजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
अॅपमध्ये पहा
x