अस्ताचा सूर्य बघता, जीवात होई घालमेल,
	दिनकरा चा निरोपाची, निघे ह्रदयात सल,
 
									
				
	मन उगाच कातर होई, वाटे कावरेबावरे,
	मनाची ही अवस्था होण्यास, काय कारण असावे बरे?
 
									
				
	पण सूर्योदय बघता, मन पुन्हा भरारी घेते,
	नव्या कल्पनेला अजून धुमारी फुटते,
 
									
				
	उत्साह संचारतो, त्या तेजोवलयाला बघून,
	नवं काव्यही स्फुरते मज, रविराजाला पाहून!