यशाची गरुडझेप, लहानग्यांचा घास चिऊकाऊ,
राजगृहीचा संदेश, विद्वानाचे मोरपिसं.
पाहुण्यांची तू चाहूल, कोकिळेची किलबिलं ,
कधी तू जटायू, कधी अर्जुनाचे लक्ष.
तूच प्रभातीचा गजरं, तूच सांजवेळीचा इशारा ,
तूच चातकाची तहान, तूच श्रावणाचा पिसारा .
किती तुझे रे सोबती, किती पार किनारे,
किती गोडं तुझे रुपं, विसरावे जग सारे.
आयुष्याची सैर संपता तुझ्याच नभांगणी मावळते प्राणज्योत,
संपता खेळ सारा स्वर्ग दालनाचा तुझ्या नभी स्त्रोत.
जमलेल्या साऱ्या नात्यागोत्यांची तूच साक्ष,
तू शिवला तर साऱ्या इच्छा पूर्ण, म्हणतात प्राप्त झाला मोक्षं.
साऱ्यांचीच होते इच्छा, एकदा व्हावे पाखरू पाखरु,
मोठे झाल्यावर वाटे जसे व्हावे पुन्हा लेकरू लेकरू.