सासरी ना, ती आई शोधायची नसते..
ती आई स्वताःत उतरवायची असते.
आग्रहाचे दोन घास आपण सर्वांना भरवायचे,
सर्वांच्या सेवेस आई परि तत्पर रहायचे..
पन्नाशीतल्या सासु ची आपणच आई व्हायचं..
त्यांना आरामात कसं ठेवता येईल यासाठी झटायचं..
त्यांनी सांभाळली ना सर्वांची वेळापत्रकं इथवर, आता, आपण सांभाळायचं..
नसते त्यांना सुध स्वतःच्या खाण्यापिण्याची..
थोडं चिडायचं ही हक्काने, कारण त्याशिवाय आई पुर्ण होत नाई..
जगासमोर खुप कठोर असणार्या सासर्यांना ही असतो एक हळवा कोपरा..
आई होऊन त्यांची बोलतं करायचं असतं त्यांना..
असते त्यांना काळजी घरातल्या प्रत्येकाची,
त्यांना त्या मायेची अन् आधाराची गरज आपल्या पेक्षा जास्त असते..
म्हणून सासरी आई शोधायची नसते, ती आई स्वतःत उतरवायची असते..