ठेवावा लागतो दगड हृदयावर,पर्याय नसतोच!

सोमवार, 17 जानेवारी 2022 (17:44 IST)
कोणत्याही वळणावर नको तो निर्णय घ्यावा लागण,
मनाची नसणारी तयारी, अन जीवात काहूर उठणं,
सोप्प नसतं च हे ठाऊक आहे, पण "परंतु " हा असतोच,
ठेवावा लागतो दगड हृदयावर,पर्याय नसतोच!
पण तोवर आपण ही कुठतरी असतो निर्धास्त, भिस्त एखाद्या वर,
पण वाटतं जेंव्हा सरकतेय जमीन, तेव्हा अवलंबून राहतो दुसऱ्या वर,
आशा वेळी घ्यावा असा निर्णय, ज्यांन  तोडगा निघेल प्रश्नांवर!
कळकळीने सांगणाऱ्याच्या, समाधान  दिसेल चेहेऱ्यावर!
होईल मगच थोडी स्थिती चांगली,मिळेल सुस्कारा,
वेळ आली मंडळी स्वतःवर जेव्हा अशी तेव्हा हाच मार्ग अंगीकारा!
...अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती