यंदा पावसाला अजिबात परतावस वाटेना,
उसंत कशी म्हणून घ्यावीशी वाटेना,
उगा हिंडतोय जिकडे तिकडे उनाड,
बळीराजा गेलाय वैतागून,पडे न उघाड,
कुठं पूर, कुठं धरणा च पाणीच पाणी,
नाकी नऊ आलं , थकला आता चाकरमानी,
पण पावसाला कुणाचीच दया येईना,
सोडून निघून जाईल, चिन्ह काही दिसे ना!
कर बाबा देवा आता तूच काहीतरी,
प्रत्येक ऋतूची मजा घेऊ दे,समतोल राख, आतातरी!!