भाज्यांच्या गप्पा

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (12:19 IST)
आंब्याचे स्वागत भाजीबाजारात झाल्या बरोबर इतर भाजीपाल्याच्या गप्पा

कलकल ऊन वाढलं की
सुकू लागतात भाज्या
थाटामध्ये प्रवेश करतो
फळांचा राजा

भाज्या भाज्यात हळू आवाजात
चर्च्या झाली सुरु
एकमेकीच्या मनातली
खद खद बाहेर आली

हिरवी ढोबळी मिरची म्हणली
" दोडक्या " कसं होईल ?
काय माहित गिऱ्हाईक कधी
आपल्याला घरी नेईल

गवार म्हणली ए कांद्या
तुझं मात्र बरंय
बारा महीने तुझी चलती
आमचं काय खरंय ?

कांदा म्हणला गवारताई
उपयोग काय त्याचा
आम्हाला फक्त तोंडी लावतेत
मुख्य मान तुमचा

दिसायला दिसतंय बुटकं
पण वांग्याला भलताच मान
काळ्या रस्याच्या भाजीला
सगळेच म्हणतेत छान

मेथी अन पालक बाई
नेहमीच हिरव्या साडीत
टमाट  म्हणतं मीच एकटा
चवीला असतो गोडीत

मला तर बाई काही काही येडे
उगीच वाळीत टाकतेत
शेपूची भाजी खाल्ली की म्हणे
वेगळेच ढेकरं येतेत

आलू , कोबी , डांगर पहा
किती जास्त लठ्ठ
भेंडी म्हणती बघा बघा
दिसते का नाही " फिट्ट " ?

शेवग्याची शेंग म्हणली
सरक तिकडं भवाने
चांगली उंची , रंग , रूप
दिलं मला देवाने

कार्ल म्हणलं मी तर आधीच
कडू म्हणून प्रसिध्द
आमची भाजी केली की
घरात होतं युद्ध

आंब्याचा थाट बाई
भलताच न्यारा दिसतो
बघ न कसा गाड्यावरती
एकदम ऐटीत बसतो

उन्हाळ्याच्या दिवसा मध्ये
लोकं ही येड्यावणीच करतेत
केशर , हापूस म्हणलं की
पटकन थैलीत भरतेत

मुडदा बाजारात आला की
दहशत निर्माण करतो
गरीब असो श्रीमंत असो
दररोज रस करतो

भाज्या म्हणल्या खरोखरच
खूप त्रास होतो
आंबा निघून गेला की
जीव भांड्यात पडतो

- Social Media

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती