नुसती गमत... दिवाळी खरेदीसाठी शुभेच्छा..

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (13:13 IST)
दुकानात साडी खरेदी चालू असते. ६०-७० साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते.
वैतागलेला नवरा म्हणतो - 
"आदिमानव खरंच सुखी होता. झाडाची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं!" 
बायको फणकारत म्हणते - "त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढ- उतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे...?
तुम्हाला तर एकाच AC दुकानात बसून फक्त मान तर हलवायची आहे....!!"
 
दिवाळी खरेदीसाठी शुभेच्छा..।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती