'शहीद कर्नल प्रतीक पुणतांबेकर' ह्यांना समर्पित

काळीज माझे फाटून जाते
होती अनंत वेदना
कसा बाळ निघून गेला
ना सांगता कुणा ।।1।।

मातृत्वाचे ऋण राहिले
मायेचा पदर झाला ओला
अश्रूंची झडी विसरून गेला
श्रावण झाला कोरडा
कसा बाळ निघून गेला
ना सांगता कुणा ।।2।।

क्षणा- क्षणांनी उभारिले आयुष्य
हे कसे तुझे
अनेक आठवणी दाटून येती
पाळावळ्यां नेत्रांपुढे
शब्द माझे मूक झाले
भावना झाल्या कोरड्या
कसा बाळ निघून गेला
ना सांगता कुणा ।।3।।

ह्या वेदना माझ्या मी
सांगेन ना कुणा
सुपुत्र तू झाला बाळा
आपुल्या मातृभूमीचा
शीर तुझे सुशोभित राहो
सदा करते ही मंगल कामना
जन्मो-जन्मी ये परतून बाळा
भूषवीन मी वीरमाता सदा
आजपासून अश्रू पुसते
ही पुष्पांजली तुला
करूनी गेला गौरवीत तू
अवघ्या कुळा.

वेबदुनिया वर वाचा