पान्हा

ND
फुटला आभाळाला पान्हा
जीव पुन्हा तान्हा तान्हा

सहत्र लेकरांची तृप्ती
मायेने कसे ओघळती मोती

शतशत हातांची ओली निगराणी
हरीताईची धरित्री राणी

आभाळाचं ऋण स्मरता स्मरता
आतून बाहेरून पाणावली कविता

हळवं आभाळ पावसाचा गहीवर
तप्त मातीवर सरीची जीव पाखड.

वेबदुनिया वर वाचा