ते स्मरण

ND
ज्याच्या नुसत्या स्मरणानं
मनाला मोरपीसाचा स्पर्श होतो
मन आनंदलहरींवर आरूढ होऊन
स्वैर तरंगत राहतं
खळाखणार्‍या लाटांबरोबर
दूर दूर वाहत जातं
उदबत्तीच्या सुगंधी वलयांसारखं
चौफेर सामावत राहतं,
अशा स्मरणाचं
विस्मरण कसं शक्य आहे ?

वेबदुनिया वर वाचा