अस्‍तर

NDND
कोठली ही अनाम हूरहूर
मनास सैरभैर करून
दशदिशात विखरून
पुन्हा माझ्याच मनाच्या दाराशी
उभी राहिली अवघडून?

वाटलं एकदा, लावावं दार धाडकन
उठून चटकन्, नको नसती अडचण
पण लक्षात आलं तिच्याशिवाय अस्तित्वाची शाल पांघरून
निवांतपणाचं सोंग कितीही आणलं वरून
तरी हुरहुरीचं रंगतदार अस्तर जोडल्याशिवाय
शालीला साक्षात ऊबच पारखी झाली आहे.
ऊबच पारखी झाली आहे....

वेबदुनिया वर वाचा