स्वभाव

ऊठसूठ इथं तिथं धावणार्‍या
मनाला दटावून
गप करून
यशोदेच्या कृष्णासारखं
बांधून ठेवलं एका खुंटाला.

चंचल मनाचा जोर इतका
की, खुंटसुद्धा खिळखिळा झाला
मनाला आवर घालता घालता
पार मोडून गेला

मनांत आलं
खुंटाच्या कृत्रिम बंधनात
राहण्याचा जर मनाचा
स्वभाव असता
तर जीवन पार
एकछापी, एकसुरी, बेचव
झालं असतं.
जगण्यातलं सगळं
चैतन्यचहरपलं असतं

आणि मग कृष्णलीलांचा
सर्व रंगच विरून
गेला असता.

वेबदुनिया वर वाचा