मराठी कविता : तहान

वेबदुनिया

बुधवार, 2 मे 2012 (18:12 IST)
WD
असा काल्पनिक संभोग किती करावा
वासनेनं कल्पनेशी अशानं स्वप्न गर्भारशी होतील.
कौमार्य जपणारी
मी, हा अभिमान बाळगतेस तो वांझोटा वाटेलच तुला
तुझं पौरूष तू सांडलंस का
या ठिकाणी ?

मग तुझी मानसिकता या
नाळेपासून दूर करताना
इतकी का घालमेल व्हावी तुझी
कातळ वितळवणारा आर्त टाहो फोडणारया
माझ्या मनातील जीवंत प्रेमलहरी

कोरड्या होण्याच्या आत
तू वाहून न्यावास यातला थेंब न् थेंब
तुझा देहच संपूर्ण बनव अधर
अन् ... पाणी पाणी झालेल्या
मला पिऊन टाकावंस तू
ह्या पौराणिक ऋषीसारखं मी नाही
मान्य करणार तुझं पितृत्व
हा पान्हा वात्सल्याचा नाही
वात्सल्याच कुणीही न्हातंच
बुडून जात नाही...

वेबदुनिया वर वाचा