तहान

ND
निळ्यासावळ्या ढग-टोकाशी
ओथंबून आले पाणी
दूर तिष्ठत एक चांदणी
तहान तशीच युगायुगाच

गर्द धन वृक्ष-पायथ्याशी
पाथस्थ कुणी थकलेला
हात लांबवून बसलेला
रिती त्याची झोळी कधीची

अफाट जलराशींच्या विस्तारी
आकंठ बुडुनी नखशिखान्ती
तडफडे कुणी एका बिंदूसाठी
अवघ्या जीवाची करूनी शिंपली

ही अशीच नियती जीवाची
आकळुनी घे जो पूर्णांशी
भरली ओंजळ त्याची पुरती
फिटे आस जन्मजन्मांची.

वेबदुनिया वर वाचा