चमत्कृती

पुरुष-प्रकृ‍ति
आकाश-धरती
प्रलय-उत्क्रांती
आवर्त अनंती

अव्यक्तातून व्यक्ती
सदाची चक्रगती
त्रिगुणांची भरती
सुखदु:ख सांगत

कर्तृत्वाची भ्रांती
फिटे जन्मजन्मान्ती
धनी कैवल्याप्रती
झाली ही निश्चित

अविद्या विद्यावती
घडतसे चमत्कृती
आनंदाच्या निधानी
मुक्कामी पोहचती.

वेबदुनिया वर वाचा