खेळ खेळता खेळता

खेळ खेळता खेळता
डाव अधुरा राहिला ।।
डाव सुटण्याच्या आधी
काळ थोडासा सरकला....

खेळ खेळता खेळता
गोटी निसटुन गेली ।।
गोटी मागे धावतांना,
मध्ये भोवळ दाटली....

खेळ खेळता खेळता
खेळ खेळता येईना ।।
अडचण अशी झाली,
काही केल्या ती सुटेना.....

खेळ खेळता खेळता
डाव हातातून गेला ।।
एकदाचा गेला पुन्हा,
नाही परतून आला.....

खेळ खेळता खेळता
जीवनाचे हसू झाले ।।
आसु पुसता पुसता,
जगण्याचे खेळ झाले .....

खेळ खेळता खेळता
वेळ सरता सरेना ।।
संध्याकाळ स्थिरावली,
अश्रू गाळता गळने.....

वेबदुनिया वर वाचा