अवतरले गणराय...

PTI
लोकमान्‍य टिळकांनी १८९३ साली पारंपरिक गणेशोत्सवाचे पुनरुज्जीवन केले आणि हिंदू घराघरांमध्‍ये गणेशोत्सव हा महत्‍वाचा उत्सव बनला. सुमारे शतकभरापेक्षा मोठी परंपरा असलेल्‍या या उत्सवाची नाळ महाराष्‍ट्राच्‍या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. अशीच एक नाळ वारकरी संप्रदायाचीही. म्हणूनच की काय गणेश भक्त आणि वारक-यांचं नातंही तसंच सनातनी आहे. या दोन परंपराचा मनोहारी संगम असलेल्‍या सावळ्या विठुराया रूपी गणेशाचे मुंबईतील एका सार्वजनिक उत्सव मंडळात आगमन झाले. वारक-यांना कदाचित या गणरायात त्यांच्‍या विठ्ठलाचे दर्शन घडले असावे म्हणूनच त्‍यांची पावलेही अशी थिरकली.

वेबदुनिया वर वाचा