Realtionship Tips : मुलांना विनोदातही या गोष्टी बोलू नयेत, त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो

शुक्रवार, 25 मार्च 2022 (11:37 IST)
आपल्या सर्वांना माहित आहे की मुलांचे हृदय खूप कोमल असते. अशा वेळी या कोवळ्या मनावर एखादी गोष्ट पडली तर ती मुलं कधीच विसरू शकत नाहीत. विशेषत: मुलांना पालकांच्या बोलण्याचं वाईट वाटतं. अशा परिस्थितीत त्यांचे मन जपण्याची जबाबदारी पालकांची आणखीनच वाढते. अशा काही गोष्टी आहेत ज्या पालक म्हणून आपण मुलांना बोलणे टाळले पाहिजे.
 
1 हे काम तुला जमणार नाही - मुलांमध्ये उर्जेची पातळी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत कधी-कधी ते वयाच्या पलीकडे जाऊन काम करू लागतात. जसे की, काहीतरी जड उचलणे. अशा परिस्थितीत मुलांना नीट समजावून सांगावे की ते मोठे होऊन कोणतेही काम सहज करू शकतात. 'हे काम तुला जमणार  नाही' असं गमतीनं म्हटलं तरी त्याला स्वतःमध्ये कमतरता असल्याचं वाटू लागेल आणि ते काम बळजबरीने करून दाखवण्याचा प्रयत्न करेल.
 
 
2 तो तुझ्या पेक्षा चांगला आहे- मुलांची तुलना केल्याने मुलांमध्ये हीन भावना येते आणि मग ज्या मुलाशी आपण त्याची  तुलना करत आहात त्याच्यावर ते राग-राग करू  लागतात. अशा परिस्थितीत मुलाची तुलना इतरांशी कधीही करू नये. 
 
3 तू का मरत नाहीस- मुलांवर राग काढताना ही गोष्ट कधीही बोलू नका. असे बोलून मुलांना असे वाटते की त्यांचे पालक त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. या गोष्टींचा मुलांना खूप त्रास होतो. 
 
4 एक दिवस मी तुला सोडून जाईन - काही पालक मुलांना घाबरवण्यासाठी अशा गोष्टी बोलता, परंतु मुलांच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ खूप मोठा आहे. यामुळे मुले घाबरू लागतात आणि मग त्यांना भीती वाटू लागते की त्यांचे पालक त्यांना सोडून जातील आणि त्यांच्या कोवळ्या मनावर त्याचा परिणाम होतो.
 

वेबदुनिया वर वाचा