Realationship Tips: हे संकेत दर्शवतात, पार्टनर आपली काळजी घेणारा आहे किंवा नाही !

रविवार, 23 जानेवारी 2022 (17:41 IST)
प्रेम करणे आणि ते जपून ठेवणे या दोन्ही गोष्टी अतिशय जबाबदारीच्या आहेत. म्हणूनच असे म्हणतात की प्रेम करणे सोपे नसते. असे अनेकवेळा घडते की प्रेमाच्या नात्यात अडकल्यावर  जोडीदाराला तुमची काळजी नाही हे लक्षात येते. तुमचा जोडीदार तुम्हाला त्याच्या उर्वरित कामानंतर वेळ देत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्याची पहिली प्राथमिकता नाही. नातेसंबंधात जोडीदाराची पहिली प्राथमिकता तुम्ही आहात का किंवा त्याला तुमची काळजी आहे की नाही, हे काही संकेतावरून समजू शकते. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 कोणत्याही नियोजनाबद्दल सांगत नाही - जर तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक वेळी फिरायला किंवा खरेदीला जाताना सरप्राईझ देत असेल.तर काही दिवस हे सरप्राईज बरे वाटते. पण जर प्रत्येक वेळी असे घडत असेल, तर समजून घ्या की त्याचा प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर उरलेल्या वेळेत तो तुम्हाला वेळ देत आहे. या गोष्टी नक्कीच लक्षात घेण्यासारख्या आहेत. 
 
2 वारंवार मेसेज करणे - जर तुमचा जोडीदार कामाच्या दरम्यान वारंवार  मेसेज करून तुमचे लक्ष वेधून घेत असल्यास हे संकेत समजून घ्या. नात्यात, हे लक्षात घेतले पाहिजे की जर तुमच्या जोडीदाराने कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तुम्हाला कॉल केला नाही तर तुम्ही त्याची  पहिली प्राथमिकता नाही. कामात व्यस्त असणे ही चांगली गोष्ट आहे पण नेहमी अशा प्रकारचे वागणे जोडीदाराने समजून घेतले पाहिजे. 
 
3 विशेष तारखां लक्षात न राहणे - असे बरेच लोक आहेत ज्यांना विशेष तारखा लक्षात राहत  नाहीत. किंवा ते असे दिवस नेहमी विसरतात. पण इतकं असलं तरी काही खास प्रसंग असे असतात जे ते नेहमी लक्षात ठेवतात. तुम्ही पार्टीला कोणता पोशाख परिधान केला होता. जर तुमचा पार्टनर अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी फारसे महत्त्वाचे नाही. असे समजून घ्या. 
 
4 आउटिंगला गेल्यावर जोडीदार लक्ष देत नाही-  जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला गेलात आणि पार्टनर फक्त मित्रांसोबतच व्यस्त असेल. त्याला तुमची अजिबात काळजी नसेल, तर तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही महत्त्वाचे नाही. कारण ज्या कपलमध्ये प्रेम आणि विश्वास असतो त्या नात्यात काळजीही असते. असे पार्टनर कधीही आपल्या पार्टनरला एकटेपणा जाणवू देत नाहीत. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती