आयुष्यात कोणीतरी खास असणं महत्वाचं आहे आपल्याला फक्त कोणाची तरी गरज आहे म्हणून नाही तर आपल्याला प्रत्येक पाऊलावर अशी व्यक्ती हवी आहे जी व्यक्ती आपल्या प्रत्येक निर्णयात आपली साथ देईल आणि आपल्या प्रत्येक खास क्षणाला आणखीनच खास बनवेल .जर आपल्याला असे कोणी आवडत असेल आणि प्रपोज करायला घाबरत असाल तर आपण या काही टिप्स अवलंबवून प्रपोज करू शकता. आपण आपल्या जोडीदाराला देखील प्रपोज करू शकता. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या प्रियकराने प्रपोज करावे अशी अपेक्षा असते. तर जाणून घ्या अशा काही टिप्स ज्या अवलंबवून आपण आपल्या जोडीदाराला प्रपोज करू शकता.
1) आवडते ठिकाण -आपण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या भावी जोडीदाराला त्याच्या आवडत्या ठिकाणी न्यावे. हे कोणतेही ठिकाण, मॉल, कॅफे, पार्क किंवा कोणतेही रेस्टॉरंट असू शकते. त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाऊनआपण आपले प्रेम व्यक्त करू शकता.