फ्लर्टिंगचे अंतिम लक्ष सेक्स!

अमेरिकेतील कॅनसास विश्वविद्यालयातील संज्ञापन विषयाच्या प्राध्यापक ज्योफ्री हॉल यांनी फ्लर्टिंगबाबत संशोधन केले असून त्यांनी पाच प्रकारचे फ्लर्टिंग नमूद केले आहे. त्यांच्यामते पुरूष आणि महिलांमध्ये पाच प्रकारची रोमँटिक देवाणघेवाण होते आणि यालाच फ्लर्टिंग म्हणतात.

ज्योफ्री यांनी या संवेदनशील विषयाच्या संशोधनासाठी ५१०० लोकांचा अभ्यास करून रोमँटिक इंटरेस्टसाठी संज्ञापन करणार्‍यांचा व्यवहारांच्या नोंदी घेतल्या. त्यांच्यामते फ्लर्टिंगचे ट्रॅडिशनल, पोलाइट, सिनसरयर, फिजिकल आणि प्लेफुल हे पाच प्रकार आहेत. 
 
ट्रॅडिशनल फ्लर्टिंग पारंपारिक प्रकारे होते. यामध्ये होणार्‍या संज्ञापनात महिलांपेक्षा पुरूष अधिक सहभागी असतात. याची सुरूवात पुरूषच करतात आणि तेच महिलांच्या मागे पडतात. याप्रकारच्या फ्लर्टिंगमध्ये नाते उशीरा बनतात आणि सुरूवातीस महिलांची भूमिका अगदी नगण्य असते. 
 
पोलाइट फ्लर्टिंग मध्ये सर्व प्रकारच्या मॅनर्स पाळल्या जातात. यामधील संज्ञापनाचे लक्ष हे सेक्स नसते. पुरूष आणि महिला दोघेही यामध्ये नियमांचे पालन करतात. यामध्ये सेक्स्युअल नात्याअगोदर अर्थपूर्ण नात्यावर भर दिला जातो. 
 
सिनसीयर फ्लर्टिंग मध्ये पुरूष आणि महिला दोघांमध्यें भावनात्मक ओढ असते. त्यांच्या भावना एकदुसर्‍यांशी जुडतात. दोघेही एकदुसर्‍यात प्रदिर्घ काळासाठी इंटरेस्ट दाखवतात आणि एका मजबूत नात्याची पायाभरणी करतात. यासारख्या फ्लर्टिंगमध्ये महिलांचा इटरेस्ट जास्त असतो. 
 
फिजिकल फ्लर्टिंग मध्ये दोघेही आपल्या पार्टनरला सेक्स्युअल एक्सप्रेशन देतात. याप्रकारच्या फ्लर्टिंगमध्ये ते आपल्या पार्टनरच्या शरीरास कोणत्याही बहाण्याने स्पर्श करून सेक्ससाठी तयार असल्याचे संकेत देत असतात. याप्रकारची फ्लर्टिंग लवकरच सेक्स नातेसंबधाचे स्वरूप घेते. 
 
फ्लेफुल फ्लर्टिंग मध्ये दोघेही खूप कमी काळासाठी एकदुसर्‍यांशी जुळतात आणि भावनात्मक संबंधापेक्षा मौज-मस्तीसाठी एकदुसर्‍यांसोबत वेळ घालवतात. फ्लेफुल फ्लर्टिंगचे लक्ष सेक्स असते. सेक्स झाल्यानंतर दोघेही एकदुसर्‍यात कोणताही इंटरेस्ट दाखवत नाही. याप्रकारची फ्लर्टिंग आपणास पार्ट्यांमध्ये बघावयास मिळते, याचे लक्ष फक्त सेक्स असते.

वेबदुनिया वर वाचा