Holi 2024: जोडीदारासोबत पहिला होळी सण या पद्धतीने करा साजरा

बुधवार, 20 मार्च 2024 (20:30 IST)
यावर्षी होळी 25 मार्चला साजरी केली जाणार आहे. ज्यांचे यावर्षी नविन लग्न झाले आहे. त्यांच्यासाठी ही पहिली होळी असून खास आहे. लग्नानंतर कपल्स होळी, धुळवड, रंगपंचमी या सणांना घेऊन उत्साहित असतात. होळी रंग, प्रेम, उत्साह यांचा सण आहे. तसेच लग्नानंतर वर्षभरात येणारे सर्व सण हे कपल्स आनंदाने साजरे करतात. म्हणूनच आम्ही नवविवाहित जोडप्यांसाठी होळी सेलिब्रेशनच्या रोमांटिक टिप्स सांगणार आहोत जेणेकरून पहिली होळी आठवणीत राहिल आणि प्रेम वाढेल. 
 
पहिल्या होळीसणासाठी  नवविवाहित जोडपे आपल्या पार्टनरसोबत नुसते रंग खेळत नाही तर त्याच्या सोबत सणाचा प्रत्येक क्षण साजरा करू इच्छित असतो. याकरिता होळीची सुरवात चांगल्या प्रकारे करावी. जोडीदार जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा त्याला प्रेमाने गुड मॉर्निग शुभेच्छा दया. सोबतच चविष्ट आणि आवडतीचा नाश्ता दिल्यास जोडीदारच्या चेहऱ्यावर गोड हास्य येईल. जारी  तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत होळी साजरी करू इच्छित असाल पण पहिल्या होळीला जर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना आमंत्रित केले तर आनंद आजुन वाढेल.होळी निमित्त पार्टीचे आयोजन करू शकतात. ज्यामध्ये कपल्स आपल्या मित्रपरिवराला, नातेवाईकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करू शकतात. होळीच्या पर्वावर तुम्ही मॅचिंग आउटफिट घालू शकतात. आपल्या जोडीदाराला सर्वात आधी रंग लावून शुभेच्छा दया. म्हणजे तुम्ही ही पहिली होळी साजरी कराल तर ती आठवणीत राहील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती