घटस्फोट झालेल्या व्यक्तीसोबत डेटिंगचे फायदे आणि नुकसान

बुधवार, 20 एप्रिल 2016 (16:04 IST)
एखाद्या तलाक झालेल्या व्यक्तीसोबत डेटिंग करणे काही चुकीचे नाही आहे बलकी ही चांगली बाब आहे की तुमचे अशा व्यक्तीशी जुळत आहे जो जबाबदार आणि संबंधांना चांगल्या प्रकारे समजतो. तर घटस्फोट झालेल्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याचे फायदे आणि नुकसानीबद्दल जाणून घ्या.  
 
लाभ #1: वेळ   
तुम्हाला या लोकांसोबत संबंध जुळून घेण्यासाठी घाईगडबड करण्याची आवश्यकता नाही आहे. ही गोष्ट निश्चित आहे की त्यांना त्याआधी फारच कडू अनुभव आलेला असतो म्हणून ते तुम्हाला एक व्यक्ती म्हणून जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेतील आणि त्याच्यानंतरच ते कोणताही निर्णय घेऊ शकता.   
 
लाभ #2: प्रतिबद्धता 
ते आधी निर्णयाच्या वास्तविकतेबद्दल स्पष्ट होतील आणि त्याच्यानंतरच कुठले वचन देतील. निश्चितपणे ते दिलेल्या वचनाशी जुळून राहतील.  
 
लाभ #3: अनुभव 
दुःख आणि वर्जनेसोबत एका व्यक्तीने बरेच काही शिकले असेल आणि बर्‍याच वेळा त्यात काही बदल देखील आला असेल कारण त्याने   जीवनात बरेच वाईट अनुभव देखील बघितले असतील.  
 
लाभ #4: मोठ्या मनाचा   
ते आपल्या मागील अनुभवापासून बरेच काही शिकले असतील आणि ह्या गोष्टी त्यांना जास्त समजदार आणि मोठ्या मनाचा बनवतो. या प्रकारे तुम्हाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे किंवा हक्क दाखवण्याची अर्थात त्यांची काळजी करण्याची आवश्यकता नसते.
 
पुढे पहा डेटिंगचे नुकसान 
नुकसान #1: दुधाचा जळलेला ताक ही फुंकून फुंकून पितो  
काही तलाकशुदा लोकांना दुःख सहन करणे फारच कठीण होऊन जात. ते त्याच चुकीची पुनरावृत्ती करणे टाळतात आणि त्याचे परिणाम म्हणजे तुम्हाला ही त्या परिस्थितीतून बाहेर येणे थोडे अवघड असते.   
 
नुकसान #2: भावनात्मक भार 
हे तेव्हा होते जेव्हा व्यक्ती निर्दोष असतो. कुठल्याही एका प्रसंगामुळे भावनांचा गुबार फुटून बाहेर पडतो कारण त्या घटनेत असे काही होते की त्यांना त्यांच्या भूतकालाची आठवण करून देत राहत. ते त्याला पकडून बसून राहतात आणि त्याला सोडणे किंवा विसरणे त्यांच्यासाठी शक्य नसते.  
 
नुकसान #3: विश्वास 
तसं तर इतर कुणाच्या व्यवहारामुळे निर्णय घेणे शक्य नसते म्हणून तुम्हाला फार धैर्य ठेवण्याची आवश्यकता असते कारण असे व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास प्राप्त करण्यासाठी अधिक वेळ घेऊ शकतात.  
 
नुकसान #4: गोंधळ (गुंतागुंत)   
घटस्फोट मिळण्यासाठी काही वेळ लागतो आणि काही कायदेशीर प्रक्रिया अशा असतात ज्यांचे काही शेवट नसतं. त्यामुळे तुमच्या वर्तमान संबंधांमध्ये काही तणाव येऊ शकतो. तर तुम्ही जर अशा व्यक्तीसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला फार समजूतदारीने वागणे जरूरी आहे. 

वेबदुनिया वर वाचा