'आय लव्ह यू' कसं म्हणू ?

आपण जर प्रेमात पडलेलो असलो आणि त्याबद्दल आपली पक्की खात्री असेल तर न घाबरता स्वत:च्या मनातल्या भावनांना वाट करून देता आलीच पाहिजे. मुळात बोलणं गरजेचं असतं अशावेळी. प्रत्येक तरुणानं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याकडे अजूनही तरुणींनी प्रपोज करण्याचा ट्रेण्ड आलेला नाही. त्यामुळे तुमचं मन जिच्यात गुंतलेलं आहे तिलाही तुम्ही आवडत असलात तरीही ती स्वत: त्याबद्दल तुमच्याशी चकार शब्दही बोलणार नाही. तिची अपेक्षा हीच असेन की तुम्ही तिला प्रपोज करावं आणि तेही रुक्षपणे नाही तर जरा रोमॅन्टीकली.

ही अपेक्षा प्रत्येकच तरुणीची असते. आपल्याला आवडणाऱ्या तरुणाने आपल्यासमोर प्रेमाची कबुली द्यावी, आपल्याला प्रपोज करावं. अर्थात प्रपोज आणि तेही रोमॅन्टीकली करायचं म्हणजे दरवेळी कविताच लिहिल्या पाहिजेत किंवा पानंच्या पानं पत्र लिहायला पाहिजेत असं नाही. आणि तिला जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते त्या गोष्टीच्या माध्यमातून प्रपोज करा.
खाली काही काही उदाहरणं दिली आहेत, ते लक्षात ठेवून प्रपोज करा.

समजा, तुमच्या मै‍‍त्रिणीला सिनेमे बघायला खूप आवडतात.. तर, तुम्हा दोघांसाठी दोन सिनेमाची तिकिटं घ्या. तिकिटं घेताना ती पुढच्या दोन-चार दिवसांनंतरची घ्या. त्या तिकिटाच्या मागे सरळ 'आय लव्ह यू' असं लिहा आणि ती तिकिटं तिला द्या. तिचा होकार असेल तर सिनेमा बघायला ती तुमच्याबरोबर नक्की येईलच !

 
ND
समजा, तुमच्या मै‍‍त्रिणीला पुस्तकं किंवा आईस्क्रीम आवडत असेल तर अशावेळी तुम्ही तयार केलेलं किंवा विकत आणलेलं ग्रीटिग पुस्तकात ठेवा किंवा आईस्क्रीमच्या बाऊलबरोबर द्या. हे असं किंवा अजून काहीही.

मुळात 'तिला' नक्की काय आवडतं हे लक्षात घ्या आणि मगच प्रपोज कसं करायचं याचा प्लॅन आखा. काही मुलींना उगीच गुळमुळ बडबड केलेली नाही आवडत. अशावेळी उगाच पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. त्यापेक्षा सरळ तिच्या समोर जा आणि तुमच्या भावना सांगून टाका.

वेबदुनिया वर वाचा