नाती रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक असतात. पण ती कितीही लवचीक असली तरी एक वळण असंही येतं की नात्याचं ओझं व्हायला लागतं. हे ओझं सांभाळण्यापेक्षा उतरून ठेवण्याकडे सध्या अनेकांचा कल दिसून येतो. खरं तर नात्यात वितुष्टपणा येतो तेव्हा कोणा एकाचा दोष नसतो, तर दोघंही त्याला समप्रमाणात जबाबदार असतात, म्हणून नातं आयुष्यभर टिकवायचं असेल तर काही बाबींचा विचार करायला हवा.