पाच कारणं.. ‘ती’ मेसेजना रिप्लाय का देत नाही?

जगभरातील तमाम तरुणांना एक प्रश्न कायम सतावत असतो, तो म्हणजे ‘ती’ मेसेजचा रिप्लाय का देत नाही? कोणताही तरुण जरी सांगत नसला, तरी एखाद्या मुलीने मेसेजचा रिप्लाय न देणं हे त्याच्यासाठी सर्वात फस्ट्रेटिंगची गोष्ट असते. मुली मेसेजचा रिप्लाय का देत नाहीत, याची 5 कारणं आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. 
 
साधारणत: जर तुमचा मोबाइल नंबर एखाद्या मुलीसाठी अनोळखी असेल, तर त्या तुमच्या मेसेजना अजिबात रिप्लाय देणार नाहीत. कारण निनावी मेसेजना रिप्लाय देणं बहुतांश मुली टाळतातच. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचा नवीन नंबर मिळाला असेल, तर आधी फोनवरुन बोला, नंबर सेव्ह करायला सांगा, त्यानंतर मेसेज करा, तरच रिप्लाय मिळेल.
जर एखादी मुलगी आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असेल, तर साधारणत: तिचा बॉयफ्रेण्ड वगळता इतरांना मेसेजचे तातडीने रिप्लाय देणं टाळते. प्रेमवीरांच्याच भाषेत सांगायचं तर, इग्नोर करते. किंबहुना कधी तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये असलेल्या मैत्रिणीला भेटलात, तर ती तुमच्यापासून थोडं लांब राहण्याचाही प्रयत्न करते. आधीच रिलेशनशिपमध्ये असल्याने तुमच्या मेसेजना रिप्लाय देणं तिला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही.
तुम्ही काही चुकीचे बोलून गेलात आणि तिला त्याचं वाईट वाटलं, तर तुमच्या मेसेजना रिप्लाय मिळणं अत्यंत कठीण आहे. कारण मुलींचा रुसवा सहसा लवकर जात नाही. त्यात तुमचा राग तिच्या मनात असेल, तर मग काही दिवस मेसेजना रिप्लाय मिळेल, याची आशा बाळगणेच चूक आहे.
कोणतीही मुलगी नवं नातं स्वीकारण्यास घाई करत नाही. विचार करुन, वेळ घेऊन कोणतंही नातं स्वीकारते. कारण तिला तिच्या भविष्याची चिंता अधिक असते. त्यामुळे तुमची नात्याबाबतची घाई, तुमच्या मेसेजना उत्तर न मिळण्यात बदलू शकते. त्यामुळे नातं दृढ होण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि तिच्याशी बोलत राहा.
नात्यामध्ये अनेकदा काही गोष्टी पूर्णत: गोंधळवून टाकणार्‍या असतात तर काही गोष्टी अडचणीत टाकणार्‍या. अशावेळी मुली काही काळ एकांत पसंत करतात. त्यांना काही काळाचा ब्रेक हवा असतो. अशावेळी तुमच्या मेसेजना रिप्लाय मिळण्याची शक्यता कमी असते.
 

वेबदुनिया वर वाचा