समांतर रेषा आहोत आपण, सोबतीन चालावं!

शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (18:34 IST)
तुझं माझं नातं हे असं, कोणतं त्याला नाव देऊ,
तुझ्या माझ्यातच न ते!, आपणच समजून घेऊ,
नकोच न कोणता अडसर, न सीमा कुठली,
मर्यादेत राहून निभावू, कुणाची तमा कसली!
सवयच आहे जगाला, काहितरी म्हणणार,
चांगलं असो की वांगल, तोंड उघडणार,
तुझ्या डोळ्यातली भाषा, मज उमगणेच पुरतं मला,
त्यातच समाधान माझं, कळलं असेलच तुला,
निर्व्याज प्रेम नसतं ?कुणी म्हटलं असं,
प्रत्येकला वाटतं ते नेहमी हवंहवंसं,
निष्पन्न काही त्यातून व्हावं की न व्हावं,
समांतर रेषा आहोत आपण, सोबतीन चालावं!
.....अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती