प्रेम

ND
प्रेम तुझे न जाणीले मी
न ही तुझ्या डोळ्यातले
न ही तुझ्या स्पर्शातले
डोळे तुझा निरोप देत राहीले
मी ते स्वीकारले मौन पणे
प्रतिसाद न देऊ शकले मी
अजाण पण, अज्ञान पणे
स्पर्शातुन न ही जाणीले मी
मनोगत तुझे प्रेमाचे ते
तरी ही स्पर्श करत आले
तो ही किती अजाण पणे
प्रेम नसे है भौतिक हे
ND
फक्त आहे दार्शनिक हे
नसे हयात गंध कोणता
तरी ही हे सुगंधीत असे
एकच मागते देवा जवळी
ठेव ज्योत कायम ही
माझ्या अश्रुतुन ही पुष्प
उमावले प्रीतिच्या गंधातले
सुगंधित हे जग करी
माझ्या मागे माझ्या मागे.