जीवन

जीवन तुमचे घडविते बाळा
कोर्‍या कागदावरची कृति मनोरम रे
आपल्या अनुवांच्या रेषेनी
जीवन मधल्या वर्तुळानी
समाधानाच्या चौकोनात
घडवत आहे तुमचे जीवन बाळा।।1।।

जीवन असावे शिवराया सारखे
अणु रेणु मधुनी असावा जीवन आदर्शरे
मित्र असावा तानाजी जसा अन
रामदास स्वामी सारखे गुरू रे
प्रयत्न माझा सदैव राहील
बनु मी तुमची जीजा माता रे ।।2।।

जीवनात असावी कास प्रयत्नांची
महाराणा प्रतापची कथा आम्हा सांगते
प्रयत्नांन मधुन सदैव जाते
यशाची पाय वाट रे
यशस्वी जीवनाची प्रथम पायरी
असते सदैव अपयशाची
यशाच्या कळसाचा हा आभार स्तंभ
लपुन जातो जरी, तरी याचे
महत्व विसरू नका
ह्याचा आधार डावलु नका ।।3।।

माझ्या घरट्याची ऊब सदैव
राहील तुमच्या पाठीशी
मर्यादेचे माझ्या घरास कुंपण
कर्तव्याच्या भिंती रे
आदर्श असे प्रवेश द्वार माझे
आदराचे घरात वारे
मायेचे छत असो डोक्या वरती
प्रेमाची राहे सदा बरसात रे ।।4।।

कर्तव्याची न साथ सोडावी
प्रेमाची न कमतरता असावी
शालीनता न कधी दूर करावी
निर्मल जल समान जीवन जगावे
हीच माझी तुम्हा शिकवण रे ।।5।।

एकच मागते तुमच्या जवळी
ठेवा लाज माझ्या दुधाची
माझ्या मागे माझ्या मागे ।।6।।

वेबदुनिया वर वाचा