सॉफ्ट स्पंजी ढोकला बनवण्याची खास टिप्स

बुधवार, 28 जुलै 2021 (14:23 IST)
ढोकळ्याचं बैटर योग्य रीत्या तयार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. बरेच लोक बैटर जास्त पातळ करुन देतात नाहीतर जास्त जाड ठेवतात. ज्यामुळे ढोकला बरोबर तयार होत नाही. त्याचे बैटर अधिक घट्ट किंवा पातळ नसावे. ते इतके पातळ करा की जेव्हा आपण आपल्या बोटाने पाण्यात एक थेंब ठेवले तर ते तरंगत वरील बाजूस आलं पाहिजे. बैटर तपासण्याची ही पद्धत योग्य आहे.
 
बैटर तयार झाल्यानंतर 10-15 मिनिटे झाकून ठेवा. याने मिश्रण सेट होण्यास मदत होते. दरम्यान, ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला तेल लावून ठेवा.
 
बैटरला खमीर येण्यासाठी बेकिंग सोडा वापरू नका. आपण यासाठी इनो वापरू शकता. बैटर सेट झाल्यावरच इनो पावडर घालून मिक्स करा. लक्षात ठेवा की पिठात इनो घातल्यावर चांगल्याप्रकारे मिसळा परंतु खूप वेळ घेऊ नका.
 
वाफवण्यासाठी ढोकळा स्टँड वापरू शकता. किंवा कुकर आणि कढई वापरा. ते तयार करण्यापूर्वी त्यात थोडेसे पाणी घालून भांडी ठेवण्याच्या स्टँडवर ढोकळा बनवा. 15 मिनिटं झाकून ठेवा. टूथपिकच्या सहाय्याने तपासा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती